वीज बिलाची होळी करताना झाली पोलिसांची झाली बाचाबाची
आज भाजप आमदार अतुल भातखलकर यांचा नेतृत्वाखाली मुंबईत कांदिवली येथे वीज बिलांची होळी आंदोलन करण्यात आले होते
वीज बिलावरुन मनसे आक्रमक, २६ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा
प्रतिनिधी , मुंबई : राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याच मुद्द्याला घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घेरलं जात आहे. मनसेनेही वाढीव वीजबिलाबाबत सरकारला धारेवर धरत वीज दरवाढ विरोधात मनसेकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं गेलं. वाढीव वीजबिल संदर्भात सर्वसामान्य जनतेकडून पोस्टकार्डवर पत्र लिहून घेऊन ही पत्र मनसेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत. दादर इथंही आंदोलन करण्यात आलं.
तसेच आज आम्ही ही पत्र जमा करच आहोत आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यत पोहचवणार आहोत. तसेच वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मनसेकडून २६ नोव्हेंबरला मुंबईत वीज दरवाढविरोधात मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. तुमच्या मनातली चीड, संताप, असंतोष यांना वाट करून दद्या असं आवाहन मनसेमार्फत सर्वसामान्य जनतेला करण्यात येत आहे. यात मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होणार असल्याची माहिती मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.
