जनतेज न्युज

भाजप चे जळगाव येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी , जळगाव : शहरातील बळीराम पेठ परिसरातील भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीच्या दरवाजा जवळ काळ रात्री अज्ञात व्यक्तीने कचरा जाळला असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली .
नेहमीप्रमाणे दररोज सकाळी कार्यालय उघडणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली . अगदी दरवाजात आणून कचरा जाळल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही हि माहिती देण्यात आली . त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी या कार्यालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली . त्यांनी पोलिसांना सूचना दिल्यावर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एका मनोरुग्ण संशयिताला ताब्यात घेतले आहे .काही दिवसांपूर्वी या कार्यालयात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असताना एका मनोरुग्णाने थेट बैठकीत प्रवेश काऊ आरडाओरड केली होती . त्यानंतर आज हा प्रकार घडला . ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या नंतरच्या जिल्ह्यातील राजकीय घडामोडीनंतर घडत असलेल्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे .