जनतेज न्युज

भारतीय जनता पार्टी पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन

प्रतिनिधी , पुणे : मागच्या एक वर्षापासून राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत विशेष म्हणजे लहान मुलगी आणि गतिमंद मुलींवर हे प्रमाण अधिक आहे राज्य सरकारची संवेदना संपली आहे असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात केला भारतीय जनता पार्टी पुणे यांच्यावतीने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. हे आक्रोश अंदोलन हात्रजच्या घटनेचा डॅमेज कंट्रोल म्हणणे संवेदनाहीन त्याचे लक्षण असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. मुंबईत झालेला खंडित वीज पुरवठा बाबत सरकारची तत्परता कमी पडत असल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.