प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ शहरातील हुडको कॉलनी ची स्थापना म्हाडाच्या अंतर्गत 27 वर्षांपूर्वी करण्यात आली होती, तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक समस्यांचा विळख्यात हुडको कॉलनील सापडलेली आहे, समस्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकांवर ती बहिष्कार घातलेला आहे,
हुडको कॉलनी मध्ये सर्व सुशिक्षित लोक राहतात, याठिकाणी काही ओपन प्लॉट असल्यामुळे इतर भागातील कचरा काही नागरिक या ओपन प्लॉटमध्ये आणून टाकत आहेत, त्यामुळे या कॉलनीत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे ,विद्युत खांब असूनही त्यावर ती लाईट लावली आली नाही, त्यामुळे रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते, सध्या पावसाळा सुरू आहे ,कॉलनी परिसरामध्ये एकही असा चांगला रस्ता नसल्यामुळे सर्वत्रच चिखलातून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे ,पिण्याच्या पाण्याचे तर बेहालच आहेत पंधरा दिवसातून हुडको कॉलनी ला एक वेळ पाणीपुरवठा केला जातो, तोही अस्वच्छ पाणीपुरवठा असतो, त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, यासाठी नागरिकांनी भुसावळ नगरपालिकेत वारंवार तक्रारी देऊनही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे ,त्यामुळे हुडको कॉलनी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन कॉलनीतील समस्यांचा पाढा वाचला, जोपर्यंत आमच्या सर्व समस्या सुटणार नाहीत, तोपर्यंत आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करणार नाही ,आमचा मतदानावर बहिष्कार असेल असे यावेळी स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे.
