प्रतिनिधी,नवी मुंबईत : नवी मुंबई, पनवेल, उरणमधील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरे कायम होणार – एकनाथ शिंदे
नवी मुंबईतील गावठाण हद्दीपासून २५० चौरस मिटर परिसरातील व साडे बारा टक्के योजनेच्या रेखांकना मधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे, नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने घेतला असून, याबाबतची अधिकृत घोषणा आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली,त्यामुळे नवीमुंबई सह रायगड मधील प्रकल्पग्रस्तांना या निर्णयाचा मोठा फायदा फायदा होणार असून गरजेपोटी बांधलेल्या लाखो नागरिकांची घरे वाचणार आहेत,बरीच वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला असून,ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे…
