जनतेज न्युज

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीचे निदर्शने

प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात गाणं विकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.. यावेळी आंदोलकांनी भाजप आणि ED विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.महाविकासआघाडी ला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून याचा एकत्रितपणे मुकाबला केला जाईल असा इशारा यावेळी आला.लोकांमध्ये जाऊन या कारवाया मागील सत्य पटवुन देण्याचा निर्धार देखील यावेळी करण्यात आला.दरम्यान या कारवायांवरुन सोशल मीडिया देखील महा विकास आघाडी आणि आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जाते यापुढे त्यांनाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिलाय.आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत EDविरोधात घोषणाबाजी केली. मंत्री मलिक यांचे दाऊद शी संबंध होते तर मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी कारवाई का केली नाही असा सवाल मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित केलाय.भाजप कडून कारवायांचा अतिरेक होत असून त्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय.