जनतेज न्युज

मंदिर परिसरात आढळली बेवारस बॅग; पोलीसांचे आपात्कालीन परिस्थितीसाठी पोलिसांची प्रात्यक्षिकं

प्रतिनिधी , सोलापूर : मंदिर परिसरात बेवारस बॅग असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ BDDS सोलापूरच्या पथकास यासंदर्भात माहिती दिली. BDDS पथकासह DYSP, अग्निशामक, १०८ नं. अम्बुलन्स, तहसीलदार, तालुका पोलीस निरीक्षक पाटील, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय भागवत, एपीआय सोनकांबळे यांचे पथक मंदिर परिसरात दाखल झाले. घटनास्थळी असलेली बॅग पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पथकाने नागरिकांना दिलासा देऊन बॅगजवळ कोणाला जाऊ दिले नाही व परिसर सील केला. BDDS पथकाचे प्रमुख पवार यांच्या पथकाने बेवारस असलेल्या बॅगेची तपासणी करून त्यामधील सर्व सामान तपासले. या बॅगेमध्ये वायर, युरियाची पुडी, सेल, टायमर घड्याळ अशा गोष्टी सापडल्या. याची माहिती BDDS च्या पथकाने वरिष्ठांना देऊन या सर्व वस्तू नष्ट केल्या. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु हा एक मॉकड्रिल होता. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी बेवारस बॅग, बॉक्स, वस्तू आढळल्यास पोलीस प्रशासन किती वेळात पोहोचू शकते याचेच एक प्रात्यक्षिक मंदिर परिसरामध्ये केले असल्याचे पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले.