प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसानं दाणादाण उडवून दिलीय. वडवणी तालुक्यातील पुसरा नदीला पूर आला असून तिगाव आणि चिंचाळा गावाचा संपर्क तुटला आहे. परिणामी दळवणाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. या गावासह अनेक छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांचा संपर्क देखील पूर्णपणे तुटला असून सध्या पुसरा नदीच्या पुलावरून पाणी वाहते आहे. दरम्यान या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केलीय. सोयाबीनसह इतर खरिपाचे पिकं काढणीला आले होते. परंतु यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. मध्यरात्री झालेल्या पावसानं बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी यासह इतर ठिकाणी झोडपून काढलं आहे
