जनतेज न्युज

मनपाने स्मशान जोगी यांचे बिल थकवल्याने स्मशान जोगी यांनी मोफत अंत्यविधी केली बंद

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद ,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत अंत्यविधी योजना चालू करण्यात आली होती या योजनेमध्ये स्मशान जोगी यांचे तीन हप्त्याचे बिल थकले होते त्यामुळे ही योजना बंद पडली होती परंतु पुन्हा एकदा ही योजना चालू केली परंतु पुन्हा एकदा सहा महिन्याचे बिल थकवले तसेच बिल तर दिलेच नाही परंतु स्मशान जोगी यांच्या लाकडाचे पैसे सुद्धा दिली नाही त्यामुळे स्मशानजोगी यांनी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत महानगरपालिका थकलेले बिल देत नाही तोपर्यंत मोफत अंत्यविधी केला जाणार नाही असा इशारा स्मशानजोगी यांनी महानगरपालिकेला दिला.
त्यामुळे थकलेल्या बील त्वरित देण्यात यावी अशी मागणी स्मशान जोगी यांनी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना केली आहे