जनतेज न्युज

मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक तीरडी सजवून अन्यत्याग आंदोलन

प्रतिनिधी, अमरावती : शहरातील रस्त्यांचीही दुर्दशा झाली असून, मनपा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. या मुद्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक पवित्रा घेत. शहरातील बाबा कॉर्नर परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी सजवून प्रशासनाचा निषेध नोंदिविला.शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे चित्र पहायला मिळते. अशाच प्रकारे रामपुरी कॅम्प प्रभागातील बाबा कॉर्नर ते सिंधी चौक हा शहरातील मध्य भागातील मुख्य रस्त्यावरीही मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून शाळा महाविद्यालय असल्यने रोज विद्यार्थ्यांची ये-जा सुरु असते. खड्यांमुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी अनेकवेळा मनपा आयुक्तांना निवेद देऊनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे वंचितचे म्हणने आहे. तसेच शहरातही प्रश्नांकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने अन्यत्याग आंदोलन द्वारे केले आहे. आंदोलनादरम्यान मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी देखील सजविण्यात आली आहे.