जनतेज न्युज

मरखेड येथे मंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय राठोड यांच्या पुतळ्याची होळी

प्रतिनिधी, यवतमाळ : उमरखेड येथे मंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय राठोड यांच्या पुतळ्याची होळी करून घोषणाबाजी करीत फोटोला चपलेने बडविले. शिवसेनेच्या बंडाचे यवतमाळ जिल्ह्यात पडसाद उमटल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले.बंडखोरीमुळे शिवसैनिक  आक्रमक झाले असून उमरखेडच्या शिवाजी चौकात  पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे यवतमाळ येथे आमदार संजय राठोड यांच्या घरासमोर पोलीसांचा तगडा बंदोबस्त आहे. या आंदोलनात चितांगराव कदम, संदीप ठाकरे शिवसेना नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.