प्रतिनिधी , मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठवत असताना मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे. हा मराठा समाजातील मुलामुलींच्या भविष्याच्या दृष्टीने काळा दिवस आहे. हा काळा दिवस आणायचे काम ठाकरे – चव्हाणांच्या महाविकास आघाडी सरकारने आणायचे काम केले आहे. हि अतिशय निंदनीय, वाईट गोष्ट घडलेली आहे. हे या आघाडी सरकारच्या मनातच नव्हते हे आरक्षण टिकावे, त्यांची हि इच्छा पूर्ण झालेली आहे. मी त्यांचा निषेध करतो आणि एक सांगतो कि, जर त्यांना मराठा समाजाच्या भवितव्याबाबत थोडे जरी प्रेम असेल तर उद्याची उद्या त्यांनी हे मराठा आरक्षण टिकवण्यासंदर्भात अध्यादेश काढावा व गरज लागली तर एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे अन मराठा आरक्षण टिकवण्यासाठी भक्कम तयारी करावी, तर अन तरच मराठा समाज त्यांना माफ करू शकेल अन्यथा मराठा समाज त्यांना कदापि माफ करणार नाही..
