प्रतिनिधी, जालना : कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्तगड येथील रहिवासी ऋषिकेश चिप्पावार मिसिंग होते. आज त्यांचा चंदन झिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यावरून त्यांच्या नातेवाईकांना कळवून मृतदेह रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांनंतर त्याच्या कुटूंबियानी पोलीस ठाण्यात येऊन कलम 306 प्रमाणे 6 जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
