प्रतिनिधी , महाड : संपुर्ण जुन महिना कोरडा गेल्यानंतर आज महाड तालुक्यामध्ये तुफानी पावसाने सुरुवात केली असुन पावसाने महाडकरांना चांगलेच झोडपले. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान महाड शहरातुन वाहणाऱ्या सावित्री आणि गांधारी नद्या इशारा पातळी ओलांडून वाहू लागल्या असुन महाड शहरामध्ये पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहरातील सखल भागात नदीचे पाणी शिरले असुन नागरीक आपले सामन आणि वहन सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. आज पुन्हा एकदा 2021 च्या महापुराच्या आठवणी महाडकरांच्या मनात ताज्या झाल्या.
