प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील मनपा कार्यालयासमोर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. मुंबई महानगरपालिका ने 600 चौरस फुटाच्या घरांना कर मुक्त केले असून, त्याच धर्तीवर औरंगाबाद शहरातील 600 चौरस फूट घरांना करातून मुक्त करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने आज रोजी करण्यात आली आहे. यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात मोठे आंदोलन मनपा कार्यालयासमोर केले असून या अगोदर ही औरंगाबाद महानगरपालिकेला आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. मात्र यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने आज रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने मनपा कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली असूनयाप्रकरणी मनपा आयुक्त यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा,
नाहीतर आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. सदरील मागणीचे निवेदन आज रोजी मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.यावेळी आम आदमी पार्टीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन आज रोजी करण्यात आले. अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
