प्रतिनिधी , औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध पक्ष संघटनाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज बंधवाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदान करण्याचे महत्त्व विशद केले.
