प्रतिनिधी, उस्मानाबाद : बियाण्यासाठी शेतकऱ्यांची खात्री असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने १ जुलै कृषीदिनानिमीत्त उस्मानाबाद तालुक्यातील सिध्देश्वर वडगाव येथे शेतकरी मेळावा घेतला . प्रथम कार्यालयात हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेचे पुजन जिल्हा शाखा व्यवस्थापक राजु माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यालयातील सर्व कर्मच्यारी उपस्थित होते तर मेळावा ठिकाणी जेष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. या मेळाव्यात श्री बिराजदार यांनी प्रस्ताविक करत बिज प्रक्रियाचे महत्व सांगीतले तर श्री माने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या अडचणीचे समर्पक उत्तर श्री माने यांनी दिले.
