जनतेज न्युज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) आज ठाण्यात आले होते.

प्रतिनिधी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) आज ठाण्यात आले होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (election) दृष्टीने ही महत्त्वाची बैठक होती. राज ठाकरेंनी या बैठकीत निवडणूक आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने सूचना केल्या. पुन्हा १५-२० दिवसांनी ठाण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातील उदभवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या मदतकार्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “प्रत्येकजण आपआपल्यापरिने मदतीचे काम करतोय.मी, ज्यावेळी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलं, त्यावेळी कोकणातल्या प्रत्येक गावात महाराष्ट्र सैनिक पोहोचला. सध्याच्याघडीला मदतकार्य महत्वाचं आहे. तिथे जाऊन पाहण्यात अर्थ नाही. मदत पोहोचले तेवढं चांगलं आहे””पूरस्थिती उदभवते, त्याचं एकमेव कारण म्हणजे, कोणत्याही गोष्टीचं नियोजन नाही. पहिल्यांदा असं घडलेलं नाही. दोनवर्षा आधी असचं झालं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. वसत्या नुसत्या वाढत आहेत. त्याला आकार-ऊकार नाही. आकार-ऊकार द्यावा, असं कुठल्याही सरकारला वाटत नाही” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.ठाण्याची परिस्थिती पाहिली तर, ठाणे टुमदार शहर होतं, आज काय स्थिती झाली? कोणात्याही शहराकडे लक्ष द्यायला कुठल्याही सरकारला वेळ नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उदभवणार. या थांबणाऱ्या गोष्टी नाहीत” असे राज ठाकरे म्हणाले.