जनतेज न्युज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धापरीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्याच्या संधीची संख्या मर्यादित केल्यामुळे एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे केले स्वागत

प्रतिनिधी , औरंगाबाद- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्याच्या संधीची संख्या मर्यादित करण्यात आली आहे याबाबत आयोगानेही निर्णय घेतला आहे आता या निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहा वेळा संधी उपलब्ध असतील तर अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील असे आयोगाने स्पष्ट केले यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे