प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाच्या साथीच्या नाजूक काळात गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटकांवर टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व इतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या पोस्टवर बारीक लक्ष ठेवून आहे. लॉकडाउनच्या काळात असे गुन्हे केल्याबद्दल महाराष्ट्र सायबरने राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण २५८ गुन्ह्यांची (८ अदखलपात्र ) नोंद २१ एप्रिल २०२० पर्यंत केली आहे. यात बीड २७, पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, लातूर ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, बुलढाणा ६, ठाणे ग्रामीण ६, गोंदिया ५,हिंगोली ५, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, सोलापूर शहर ३, रायगड २, धुळे २, वाशिम १, औरंगाबाद १ (एन.सी) यांचा समावेश आहे.
आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११४ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ९०. टिकटॉकचे विडिओ शेअर प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरवर आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३.
इतर सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) चा गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यात आतापर्यंत ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत उत्तन सागरी पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. ज्यामुळे ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ६ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने एका कोरोना बाधित व्यक्तीस quarantine करण्यासाठी ऍम्ब्युलन्समधून घेऊन जात असतानाचा विडिओ बनवून, चुकीच्या माहिती सोबत व्हाट्सअँपवर प्रसारित करून, कोरोनाकग्य साथीबद्दल चुकीची माहिती देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे. यातील आरोपीने परिसरातील दुकाने चालू असण्याच्या वेळेबाबत खोटी माहिती पसरवून.
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे आहेत, अशा आशयाची पोस्ट्स व्हाट्सअँपवर टाकली होती.महाराष्ट्र सायबरने राज्यातील सर्व नागरिक आणि मुख्यत्वे ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती केली आहे की, मुले ऑनलाईन surfing करताना. त्याच्यावर विशेष लक्ष ठेवा . ते कोणाशी ऑनलाईन ‘चॅट’ करत असतील तर.
समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती घ्या, तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लीक करत आहेत, किंवा काय वेबसाईट browse करत आहेत यावर लक्ष ठेवा. स्वतः सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट टाळा कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे प्रमाण वाढते आहे. आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा. तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळा .
तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा. काही आक्षेपार्ह आढळ्यास www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर माहिती द्या, असे आवाहन महाराष्ट्र सायबर, मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षकानी केले आहे.
