जनतेज न्युज

महाविकासआघाडी ही महाराष्ट्राला गती देण्यासाठी बनली आहे :-यशोमती ठाकूर..

प्रतिनिधी , जळगाव : महाविकास आघाडीच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे यावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की महाविकासआघाडी ही महाराष्ट्राला गती देण्यासाठी बनली आहे, विरोधक पण खंबीरपणे विरोधाचे काम बजावत आहेत हे वर्ष सरकारला खूप मोठा चॅलेजिंग वर्ष होतं सरकारने या वर्षामध्ये खूप मोठी कामे केली आहेत कोरोनाच्या महामारी मध्ये महिला व बालकल्याण मंत्रालयाने खूप मोठी जबाबदारी पार पाडली आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटातील महिलांनी यामध्ये मोलाचे काम केले आहे असेही यावेळी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर मत व्यक्त केले आहे चाळीसगाव येथील शहीद झालेल्या सुपुत्र ही यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आज यशोमती ठाकूर या जळगाव येथील महिला व बालकल्याण समिती या आढावा बैठकीसाठी आल्या होत्या.