जनतेज न्युज

महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय अंतिम टप्यात – उदय सामंत

प्रतिनिधी , मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्याची कमेटी नेमली असून ९० दिवसात तिचा अहवाल येणार आहे. त्या अहवालात त्या महाविद्यालयाचा अभ्यास कसा असेल, त्याची इमारत कशी असेल, त्यात कोर्सेस कोणते असतील किती दिवसांचे असतील याचा सगळा अभ्यास करून या कमेटीचा अहवाल आल्यावर तात्काळ हे आंतरराष्ट्रीय विद्यालय निर्माण होईल. तसेच मुख्यमंत्र्यांच स्वता या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाला पाठबळ असल्यामुळे याला कुठलाही निधी कमी पडणार नाही. असही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
तसेच महाराष्ट्रातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात आला असून लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात येईल. कोविडचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. पण तरीही सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल असही ते म्हणाले.