प्रतिनिधी, नागपुर : जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरच्या रेड लाईट एरिया गंगा जमुना मधे महिलांनी रस्त्यावर उतरून साजरा केला काळा दिवस. माघील 8 महिन्या पासून नागपूर पोलिसांनी रेड लाईट एरिया बंद करून ठेवला आहे. अनेक दिवसांपासून इथल्या वारंगणा आंदोलन करत आहे.आज महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्वाला धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काळा दिवस साजरा करण्यात आला. इथल्या महिला रस्त्यावर येऊन मानवी श्रुखला बनवली बनवली, राज्य सरकार व नागपुर पोलीस प्रशासन च्या विरोधात नारे बाजी केली.राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
