जनतेज न्युज

महिला परिचर महासंघाचे जिल्हा परिषदे समोर धरणे आंदोलन… सेवेत कायम करावे,किमान वेतन 18 हजार रुपये देण्यात यावे या प्रमुख मागण्या…

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचर यांना सेवेत कायम करावे,किमान वेतन 18 हजार रुपये देण्यात यावे या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने बुलडाणा जिल्हा परिषदे समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे,जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहिल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे..