प्रतिनिधी, औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील मांडकी या गावातील तरुण युवक आकाश वामन आव्हाड याची निवड नुकतीच राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट संघात झाली आहे या क्रिकेट स्पर्धा ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे 25 मे ते 29 मेच्या दरम्यान होणार आहे.आकाशची घरची परिस्थिती एकदम हलाखीची व प्रतिकूल असून त्याची आई उषाबाई आव्हाड याचे सासर बाभुळतेल असून त्यां गेल्या विस वर्षांपासून पतीनें दुसरे लग्न केले म्हनून विभक्तपणे माहेरी मांडकी येथे राहत असून आकाश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या जन्मापूर्वीच त्यां माहेरी राहायला आल्या पुढे संसाराचा गाडा त्यां शेतीत मिळेल ते काम व मोलमजुरी करून हाकलू लागल्या सध्या आकाश देवगाव रंगारी येथे एका महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असून आईला हातभार लावण्यासाठी तोही शेतमजुरी करून शिक्षण घेत आहे मात्र क्रिकेटची आवड बालपणापासून असल्याने आकाश पारंगत आहे आकाशची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे 25 मे ते 29 मेच्या दरम्यान या स्पर्धा होणार आहे.
