जनतेज न्युज

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात खोडा ; माजी खासदार हरिभाऊ राठोड सचिवांना भेटले

प्रतिनिधी , यवतमाळ : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात आरक्षणाची महाधिवक्ता यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे बढतीत खोडा निर्माण झाला आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव संजीव कुमार यांना भेटले.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा बढती मधील आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. उलट गुंता वाढणार आहे. मंत्री गटाच्या बैठकीत बिंदू नामावलीचा वापर न करता ज्येष्ठतेचा विचार करून बढती देण्याबाबत चर्चा झाली. असे झाल्यास असंवेधानिक होणार आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा बढती मधील आरक्षणाचा तिढा महाधिवक्ता यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे निर्माण झाला. ही बाब सचिव संजीव कुमार यांच्या लक्षात आणून दिली.