जनतेज न्युज

मिक्सोपॅथी विरोधात आय.एम.ए चे धुळ्यात आंदोलन.

प्रतिनिधी , धुळे : आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय.एम.ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या सर्व शाखांमधील डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी धुळे जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात हे आंदोलन केले आहे.
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने (सीसीआयएम) शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित केले. या रात्रपत्राला विरोध करण्यासाठी, तसेच केंद्र सरकारने आयुर्वेदाच्या डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास दिलेली परवानगी मागे घेण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी आज देशभरा सह धुळ्यात आज आय.एम.ए च्या डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. अशी माहिती आय.एम.ए च्या धुळे जिल्हा प्रमुख डॉ.जया दिघे यांनी दिली.