प्रतिनिधि , सांगली : मिरज मधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू केलंय. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करा या मागणीसाठी आज सकाळी पासूनच डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातात लक्षवेधी फलक घेऊन निदर्शने केली. मिरज वैद्यकीय रुग्णालया समोर हे आंदोलन करण्यात आलाय. या आंदोलनात महिला डॉक्टरांची उपस्थिती होती.
महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनात मिरज डॉक्टरांचा सहभाग नोंदवत हे आंदोलन केलंय. राज्य सरकार जोपर्यंत कंत्राटी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत मागण्या मान्य नाही झाल्या तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
