जनतेज न्युज

मुंबईच्या जी साउथ वॉर्डमध्ये कोरोनाचे थैमान; ३९० पॉझिटिव्ह तर १७ जणांचा मृत्यू

प्रतिनिधी , मुंबई : देशातील काही राज्ये सोडली तर महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबईत सर्वांत जास्त आहे. यातही जी साउथ वॉर्डमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.

गोवा ठरले करोनाला हरवणारे देशातील एकमेव राज्य !

आतापर्यंत या भागात ३९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे . जी साउथ वॉर्ड अंतर्गत लोअर परेल, वरळी आणि प्रभादेवी हे परिसर येतात . या भागात कोळीवाडा, जनता कॉलनी आणि जिजामातानगर येथे राहणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही जास्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.