जनतेज न्युज

मुंबईतील सात वॉर्डात उद्या पाणी पुरवठा बंद…

ट्रॉम्बे सुमननगर मधील जल वाहिनीची दुरुस्ती
प्रतिनिधी , मुंबई : शीव ट्रॉम्बे येथील सुमनंगर जंक्शन जवळून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सात वार्डामधील पाणीपुरवठा बुधवार ११ नोव्हेंबर बंद राहणार आहे.तर १२ नोव्हेंबर ला कमी दाबाने पाणपुरवठा होणार आहे.
शीव ट्रॉम्बे येथील सुमन नगर जंक्शन जवळून जाणाऱ्या १८०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती असल्याचे मुंबई महानगर पालिकेला आढळले.त्यामुळे ही गळती तातडीने बंद करण्यासाठी बुधवारी सकाळी १० ते रात्री ८काम सुरू राहणार आहे.त्यामुळे मंगळवारी रहिवाशांनी पाणी जपून आणि साठा करून ठेवावे.