रामदास आठवले धुळे जिल्हा दौऱ्यावर…
प्रतिनिधी, धुळे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज धुळे दौऱ्यावर आले होते या दरम्यान मंत्री आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला यादरम्यान नुकत्याच चार राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचे सकारात्मक परिणाम महाराष्ट्र राज्य मध्ये देखील आगामी निवडणुकांमध्ये दिसून येतील असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच या चार राज्यांच्या निवडणुकीचा सर्वात मोठा परिणाम हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वरती बघावयास मिळतील आणि मुंबई महानगरपालिकेवर आगामी महापौर हा भाजपचा असेल तर उपमहापौर हा आरपीआयचा असेल असा विश्वास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
राज्यात परिवहन मंत्री राहुन चूकलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सध्या एसटी महामंडळाचा सुरू असलेला तिढा सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरला असल्याचे देखील टोला लगावत राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना विलगीकरण यापासून दूर ठेवत असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर चार राज्यांमध्ये भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने चांगल्या पद्धतीने यश संपादन करता आले आहे परंतु पंजाब मध्ये भाजपचा निर्णय चुकल्याने पंजाब मधून भाजपला सत्ता मिळवता आली नसल्याचे देखील मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
