जनतेज न्युज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहरात विराट सभा होणार – फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज सोमवार 30 मे रोजी औरंगाबाद शहरात राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते, आंबा महासंघाच्या वतीने आज पिकेल ते विकेल या योजनेच्या अनुषंगाने केसर आंबा महोत्सव चे उद्घाटन फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले आहे या वेळी ते माध्यमांशी बोलताना सांगितले की. आठ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली असून सभेची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा मोठी विराट होणार असून त्या अनुषंगाने पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना दिली आहे.यावेळी सगळे मराठवाड्याला शिवसेनेचा मोठा जनसागर पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.