जनतेज न्युज

मुख्यमंत्री महोदय छत्रपतींचा महाराष्ट्र केवळ भाषणात नको, कृतीत दाखवा: चित्रा वाघ

प्रतिनिधी , मुंबई: महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं सत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पेणमधील चिमुरडीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना अतीव वेदनादायी आहे. जिने अद्याप आयुष्यही पाहिलं नाही, हसण्या-बागडण्याचे दिवस असताना तिच्यावर निर्घृण बलात्कार करुन हत्या करण्यात आली. आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कोरोना काळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती, की त्यांना न्यायालयाला विनंती करावी, की महिलासंबंधी गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना कोरोना काळात जामीन किंवा पॅरोलवर सोडण्यात येऊ नये” असं चित्रा वाघ म्हणाल्या. राज्यात आज ६० वर्षीय आजीपासून अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीतही दिसू द्या, असं आवाहन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.