जनतेज न्युज

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नितीन कदम यांची मदत ; पालकमंत्र्यांकडे धनादेश केला सुपुर्द

प्रतिनिधी , अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध मान्यवर, संस्थांनी मदत करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. त्याला प्रतिसाद देत येथील उद्योजक नितीन कदम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 55 हजार 555 रूपयांचा धनादेश आज जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला.

श्री. कदम हे हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मदतीचा धनादेश आज सकाळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत धन्यवाद दिले. कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.