जनतेज न्युज

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तुफान प्रतिसाद, अवघ्या ५ दिवसांत २१ हजार मावळे कोरोनाच्या युद्धासाठी तयार

प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाशी लढत असताना आपल्यासारख्या योद्धांची आम्हाला आणि महाराष्ट्राला खरी गरज आहे. जे वैद्यकीय क्षेत्रात असतील त्यांनी या युद्धात सहभागी होऊन कोरोसारख्या संकटाला दूर करण्यास मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आरोग्य क्षेत्राशी जुळून असलेल्या २१ हजार जणांनी कोरोना नियंत्रणाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केले असून आता या अर्जांची छाननी होत आहे. यानंतर या व्यक्तींना त्या त्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर अवघ्या ५ दिवसांत २१ हजार जणांनी विविध अर्ज करुन तशी इच्छा व्यक्त केली. यामध्ये ९४३ डॉक्टर्स, ३३१२ परिचारिका, ११४१ फार्मसिस्ट, ८६३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ७६६ वार्ड बॉय, ६१४ पॅरा वैद्यकीय, ५६९ इतर वैद्यकीय, ७६ सैन्यातील निवृत्त जवान यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इतर व्यक्तींमध्ये समाज सेवक, वैद्यकीय स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अर्ज करण्यात आलेले देखील अनेकजण आहेत. या सर्वांसाठी एक गुगल फॉर्म देण्यात आला आहे. त्यातून सुमारे १८ हजार व्यक्तींनी हे फॉर्म भरुन दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.