जनतेज न्युज

मुलींच्या निरीक्षण गृहातील प्रलंबीत प्रस्ताव लवकरच दूर करणार – ना. यशोमती ठाकूर…

प्रतिनिधी , बुलडाणा : अन्याय ,अत्याचार झालेल्या अल्पवयीन , निराधार, कुमारी माता आदि मुलींना बाल सुधार गृहात ठेवण्यात येते, मात्र या मुलींना पाच दिवसांपेक्षा जास्त निवारा देण्याची परिस्थिती आल्यास जिल्ह्यात तशी व्यवस्था नाही , या मुलींना अकोला, अमरावती, औरंगाबाद याठिकाणच्या सुधार गृहात पाठवावे लागते, त्यासाठी बाल संरक्षण समिती ला अनेक अडथळे निर्माण होतात, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते , त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मुलींचे सुधार गृह व्हावे यासाठी बाल संरक्षण समिती कडून महिला व बालकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे हा प्रस्ताव प्रलंबित होता, ह्या सर्व तांत्रिक अडचणी पूर्ण करून लवकरच जिल्ह्यात मुलींसाठी बाल सुधार गृह सुरू करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे , ते बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना बाल सुधार गृहाला भेट दिली.