प्रतिनिधी , औरंगाबाद : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडी च्या पुढाकारातून २७ जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यात किसानबाग आंदोलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आत्याचार ग्रस्तांनी एकत्र येऊच नये, असे आरएसएसचे षडयंत्र आहे. म्हणून मुस्लिम आणि इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करत आहे. म्हणून किसान बागेच्या माध्यमातून या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मुस्लिम समाजाच्या किसान बाग आंदोलनामुळे आरएसएस भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केले.
