जनतेज न्युज

मोक्षधाम झाले वन उद्यान… ममदापूर ग्रामस्थांनी श्रमदानातुन केले मोक्षधाम सुंदर…

अमरावती जिल्ह्यातील वणी ममदापूर या छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी श्रमदान व वर्गणीतून गावाला लागून असलेल्या मोक्षधामात रंगरंगोटी,झाडे,बसण्याची व्यवस्था करत राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या नावाने सुंदर असे वन उद्यान बनविले असून या ठिकाणी प्रसन्नमय वातावरण मिळत असल्याने विविध कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होत असतात.

कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी न देता गाडगे महाराज यांनी आपल्या कीर्तनातून खेडोपाडी ग्रामस्थ लोकांचे प्रबोधन केले महाराजांच्या सूत्रे पालन आज प्रत्येक ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात झाले तर गावे सुंदर व समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करत राहील अशा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या विचाराला आत्मसात करत तिवसा तालुक्यातील ममदापुर येथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सचिव व ग्रामस्थांनी निर्धार करत आपल्या गावातील मोक्षधाम सुंदर करण्याची मोहीम हाती घेत मोक्षधामाच्या परिसरात श्रमदान करत सुमारे 200 वृक्षारोपण करत येथील झाडाची देखभाल केली तसेच पक्षांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अशा या ठिकाणी गाव सुंदर..मोक्षधाम सुंदर संकल्पनेचा उद्देश ठेवून ग्रामस्थांनी वन उद्यान फुलवून निसर्गमय वातावरण निर्माण केले असून याकरिता गावातील नागरिकांनी लोकवर्गणी व श्रमदान केले त्यामुळे या मोक्षधामची चांगलीच चर्चा जिल्ह्यात होताना दिसत आहे.