जनतेज न्युज

यंदापासून शिवराज्याभिषेक दिन होणार स्वराज्य दिन

प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर ६ जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन आता स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. महा विकास आघाडी सरकारने यंदापासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवी गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अशीही माहिती यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.