जनतेज न्युज

यंदा आमचा विचार केला नाही तर आम्ही त्यांना जागा दाखवू – उत्तर भारतीय नेत्यांचा शिवसेना भाजपाला इशारा

प्रतिनिधी, कल्याण  : काँग्रेस उत्तर भारतीयांची प्रतिष्ठा होती ,काँग्रेस पक्षात महाराष्ट्राचा गृहराज्य मंत्री उत्तर भारतीय झालाय ,मुंबई सारख्या महापालिकेचे तीन महापौर उत्तर भारतीय झाले ,आता आम्हाला नगरसेवकाच्या तिकीट साठी भीक मागावी लागतेय असे वक्तव्य डोंबिवलीत आयोजित हिंदी भाषा जनता परिषद या कार्यक्रमादरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ दुबे यानी केलं .पुढे बोलताना  येणाऱ्या काळात आम्हाला प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेवु व राजकीय पक्षांना जागा दाखवून देऊ असा सज्जड दम दुबे यानी शिवसेना भाजपला दिलाय .