जनतेज न्युज

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत .

प्रतिनिधी : यंदा पावसाने संपूर्ण कळमेश्वर सावनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच नेस्तनाबूत झाली. दिवाळीच्या सणासाठी नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असताना अद्याप एकही रुपया शेटक्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने दिवाळीला शासनाकडून मदत मिळण्याची आशा संपल्याने आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यानं समोर उभा राहिला आहे.
परतीच्या पावसाने कळमेश्वर – सावनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वर्षाचे कापूस नष्ट करून टाकले. शेवटी शेतकऱ्यांकडे शेवटी शासनाच्या मदतीशिवाय काहीही एक उपाय शिल्लक राहिला नाही. शासनाने मदत जरी जाहीर केली असली तरी हेक्टरी दर निश्चित केला नाही. कृषी खात्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून तसा अहवाल महसूल विभागला कृषी विभागाने दिला आहे . लवकरच मदतीची रक्कम आपल्या खात्यात जमा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.
लवकरच दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला. खर्चाला रुपया नाही. अशा परिसथितीमध्ये शेतकऱ्यांनी दिवाळी हा सण कसा आनंदात साजरा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
बाईट शेतकरी -संजय टेम्बेकर सावनेर