प्रतिनिधी, अमरावती : 21 तारखेला उमेश कोल्हे यांच्या हत्या झाली त्यानंतर आम्ही सातत्याने पोलीस आयुक्त आरती सिंग यांना जेव्हा या हत्ये संदर्भात विचारणा केली त्यावेळी ही हत्या रॉबरीतुन झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली,तत्कालीन पालकमंत्री ठाकूर यांच्या दबावातच गुन्हा दडपण्याचा प्रयत्न होत होता. मास्टर माइंड इरफान खान यांच्यासोबत माझे व खासदार नवनीत राणा यांचे कोणतेही संबंध नसून तो काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा पलटवार अमरावती बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी जे गृहमंत्र्यांना पत्र पाठवले ते 29 तारखेला पाठवले मात्र 27 तारीख त्यावर अनावधानाने झाली अशी सारवासारव सुद्धा आमदार रवी राणा यांनी केली आहे.आज पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्यावर आरोप करून उमेश हत्याकांड प्रकरणी राणा दाम्पत्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती.
