प्रतिनिधी, ठाणे : राहुल गांधी यांच्यावर केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने ईडीची कारवाई करत आहे याविरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता त्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जाण्यापासून अडवलं आणि पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. भाजपा काँग्रेसला प्रतिउत्तर देण्यात कधीच मागे पडणार नाही तसेच राहुल गांधी यांना लवकरच अटकेला सामोरे जावे लागेल, असे भाजप सरचिटणीस मनोज सुखदरे यांनी म्हटले आहे.
