जनतेज न्युज

येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारा विरोधात आमरण उपोषण….

प्रतिनिधी, येवला: ग्रामपंचायत सायगांव येथील प्रशासनाच्या मनमानी गैर कारभारा विरोधात येवला पंचायत समिती कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब अहिरे,अरविंद उशीर ,योगिता निघुट हे आमरण उपोषणाला बसले होते,सदरच्या मागण्या
1)ग्रामपंचायत सदस्य यांच्या मासिक मिटिंग मध्ये चर्चा झालेल्या विषया वर विरोधी सदस्यांनी अपेक्ष व हरकत घेतले असता त्याची प्रोसेडिंग ला नोंद घेण्यात यावी.
2)     ढाकणे वस्ती व निघुट वस्ती येथील पाईपलाईन ची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
3) ग्रामपंचायतने  15 व्या वित्त आयोगातून स्ट्रेट लाईटचे बिले न भरणे बाबत ठराव मंजूर करावा.
4)     गावातील नादुरुस्त असलेले  सौरदिप चालू करण्यात यावे आदी मागण्या आमरण उपोषण सुरू आहे.