प्रतिनिधी : पुणे , नाताळ या येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाचे औचित्य साधूनमहाराष्ट्र मुस्लिम फ्रंटतर्फे डायसेस बिशप पाल दुपारे यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कारनाताळ या येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुलगेट येथील बिशप हाऊसमध्ये महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्याहस्ते डायसेस बिशप पाल दुपारे यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल , हाजी इकबाल तांबोळी , विजय चव्हाण , महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे पुणे शहर अध्यक्ष जफर खान व अन्य पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी बिशप पाल दुपारे यांनी सांगितले कि ,प्रभू येशू ख्रिस्त यांनी जगासाठी शांतीचा संदेश दिला . तारणासाठी परमेश्वराने त्याला म्हणजेच देवाच्या एकुलते एक पुत्राला म्हणजे प्रभू येशूला २००० वर्षांपूर्वी मनुष्यरूपाने या जगात जन्मास आणले . येशू ख्रिस्ताने जगाची सुटका पापापासून करण्यासाठी वधस्तभावर आपला प्राण दिला . आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थान झाले . आज जगात सर्वत्र हिसांचार व अशांती फोफावली असताना येशू ख्रिस्ताने मात्र संपूर्ण जगासाठी शांतीचा संदेश दिला . यावेळी बिशप्सनी पुणेकरांना नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या .
