जनतेज न्युज

रत्नागिरी भाजी मार्केट मधील भाज्यांच्या दरावर अवकाळी पावसाचा परिणाम

प्रतिनिधी, रत्नागिरी : दिवाळी काही दिवसावर आली असताना कडधान्यांन प्रमाणे रत्नागिरी मध्ये सध्या भाज्यांचे दर हि वाढलेले पाहायला मिळत आहे. रत्नागिरीत भाजीपाल्याचे पीक घेणारे शेतकरी कमी असल्यामुळे इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीत भाजीची आवक होत असते. सध्या इतर जिल्ह्यात देखील सततच्या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे.भाजी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.यात भाजीचे पीक खराब झाल्यामुळे भाजीची आवक कमी होऊन दर देखील वाढले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना भाजी जास्त दराने विकावी लागते.म्हणूनच भाजी विकत घेणाऱ्या ग्राहकांना भाजी चढ्या दराने घ्यावी लागत आहे. याचा परिणाम घरच्या बजेटवर झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.वाढलेल्या भाजी दारामुळे गृहिणींना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे नक्की.