जनतेज न्युज

रस्त्यांवर शुकशुकाट ; अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मात्र बाजारात गर्दी..नांदगांव शहरातील परिस्थिती..

प्रतिनिधी , नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाकडून बुधवारी रात्रीपासून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यानंतर आज सकाळी नांदगांव शहर व परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला.मात्र सकाळी ७ ते ११ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याने नागरिकांनी किराणा दुकान, औषधे व भाजीपाला घेण्यासाठी मात्र गर्दी केली.दुकानदारांमध्ये अजूनही लॉकडाऊन बाबत संभ्रम असल्याने अनेकांनी आपापली दुकाने थाटलेली होती.तर नांदगांव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यादेखील सुरळीत सुरू आहे