प्रतिनिधी , इंदापूर : आपल्या घरचा कार्यकर्त्यांचा राबता उरकुन सकाळी इंदापूर तालुक्यातील दौऱ्यावर निघालेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अचानक थांबले.. ते का थांबले तर गावातील एका वृद्ध महिलेने भरणे यांना हात केला आणि भरणे अचानक थांबले … त्या वयोवृद्ध महिलेला बरोबर घेऊन गाडीचे सारथ्य करत गावात नेऊन सोडले….
राज्यमंत्रीअसून ही भरणे यांचे पाय जमिनीवर आहेत असे बोलले जाते त्याचा प्रत्यय आज सकाळी उपस्थितांना आला …
कलाबाई श्रीरंग गायकवाड अंथुर्णे असे या वृद्ध आज्जीचे नाव आहे.. राज्यमंत्री भरणे हे मला खूप माया लावतात त्यांचा जन्मच माझ्यासमोर झाला आहे त्यामुळे त्यांनी मला पाहतात अचानक गाडी उभा करून माझी ख्यालीखुशाली विचारली दवाखान्यासाठी मला दोन हजार रुपये दिले असे आजीने सांगितलेय ..
राज्यमंत्री होऊन देखील कार्यकर्त्यांचा राबता आणि नागरिकांच्या समस्या सोडविताना मंत्रिपदाचा हावभाव न आणता जमिनीवर पाय असलेला नेता अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये हे दृष्य पाहिल्यानंतर उमटली होती..
