प्रतिनिधी, सांगली : राज्यसभा निवडणूकीत भाजपाच्या कोल्हापूर च्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या पवारांना चितपट केले. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय आखाड्यात कोल्हापूरचे दोन पैलवान उतरले होते .मात्र महाविकास आघाडीची मते फोडत भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी सेनेच्या पैलवानाला राजकीय आखाड्यात चितपट करत आपली खासदारकीवर मोहर पुन्हा उमटवली.राज्यसभा निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढती मध्ये धनंजय महाडिक यांच्या विजयी झाल्याची बातमी त्यांच्या वाळवा तालुक्यातील येलूर या मुळगावी समजताच पहाटेपासून महाडिक कार्यकर्ते समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी वआनंदोत्सव साजरा केला.येलूर येथील ग्रामपंचायत व बाजारपेठेत कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी भास्कर जाधव, पाणीपुरवठा चेअरमन भगवानराव जाधव ,सोसायटी नंबर 1 चेअरमन धनाजीराव गायकवाड, सोसायटी नंबर 2 विजय पाटील, चेअरमन ग्रुप बाळासो जाधव, सरपंच रणजीत आडके, सतीश पाटील शहाजी पाटील, रामचंद्र जाधव ,सरदार गायकवाड ,विनायक महाडिक ,राजेंद्र गायकवाड ,जयकर जाधव व उपस्थित होते.
