जनतेज न्युज

राज्यसरकारचा निर्णय दुर्दैवी,सुडाचं राजकारण करणारा आणि खोट्या मनोवृत्तीचा निर्णय आहे – केशव उपाध्ये

प्रतिनिधि , मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असून राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.

यावर बोलताना, ‘राज्यसरकारचा निर्णय दुर्दैवी,सुडाचं राजकारण करणारा आणि खोट्या मनोवृत्तीचा निर्णय आहे’ ,असं मत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले आहे.